मुंबई : सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मंत्र्याची मातोश्रीवर बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी 'मातोश्री'वर बोलावली आहे. ही नियमित बैठक असल्याचे सांगितले जात असले तरी, त्यात राज्य सरकारमध्ये पक्षाच्या मंत्र्याची कामगिरी तसेच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवर चर्चा होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्याना संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या मंत्र्यानी अलीकडेच भाजपच्या केंद्रीय मंत्र्याची भेट घेतली होती. त्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प पार पडला. पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठोस निर्णयाचे पुढे काय हा प्रश्न अजूनही कायम आहे. तसेच अन्य पक्षातील आमदार संपर्कात असल्याची आणि मध्यावधी निवडणुकीची हूल भाजपनं दिलीय. 


काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर असल्याची बातमीही सध्या जोरात चर्चेत आहे. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर भाजपच्या मंत्र्यांकडून दबाब आणि शिष्टाई असं दुहेरी व्यूहरचना आखली जातेय. या सर्व मुद्द्यांवर आज मंत्र्याच्या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित मानले जातेय.