मुंबई : यवतमाळचे पालकमंत्री बदलल्या प्रकरणी शिवसेनेची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे संजय राठोड यांना बदलल्याने शिवसेना नाराज झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. शिवसेनेशी चर्चा न करता मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांनी बैठकीतून वॉकआऊट केलं.


बैठकीतून बाहेर पडताना बुलेट ट्रेनचा निर्णयही शिवसनेने थांबवला. बुलेट ट्रेनबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली आहे. पण आता यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहे.


भाजपाचे मदन येरावार यांच्याकडे यवतमाळचे पालकमंत्रीपद दिले आहे. आजच्या बैठकीला शिवसेनेचे सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, एकनाथ शिंदे हे मंत्री हजर होते. हे मंत्री नाराजी व्यक्त करून बैठकीतून बाहेर पडले.