मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक मातोश्रीवर सुरू आहे. भाजप सोबत युती करण्यासंदर्भात महत्वाची चर्चा सुरू आहे. त्याच बरोबर भाजपला कोणत्या जागा सोडायच्या याची ही चर्चा होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यातही भाजप राज्य कार्यकारिणीची बैठकी सुरु आहे. एकला चलो रे चा नारा या बैठकीत देण्यात आला आहे. सत्तेत कुणीही वाटेकरी नको असं विधान भाजप नेते मधु चव्हाण यांनी केलंय. याआधीही विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेशी युती नको अशी भूमिका मधु चव्हाण यांनी मांडली होती. तोच सूर आजही पाहायला मिळाला. त्यामुळे शिवसेनेच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागून आहे.