धक्कादायक! केईएम, शीव रुग्णालयातील 18 डॉक्टरांना डेंग्यू
मुंबईकरांसाठी एक धक्कादायक बातमी. केईएम आणि शीव रुग्णालयातल्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच डेंग्यू झाल्याचं उघड झाले आहे. गेल्या दोन महिन्यांत सुमारे 18 निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली आहे.
मुंबई : मुंबईकरांसाठी एक धक्कादायक बातमी. केईएम आणि शीव रुग्णालयातल्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच डेंग्यू झाल्याचं उघड झाले आहे. गेल्या दोन महिन्यांत सुमारे 18 निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली आहे.
या सर्व डॉक्टरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी अनेक डॉक्टर विश्रांतीसाठी अजुनही रजेवर आहेत. मुंबईत दोन हजारांवर डेंग्यूचे संशयित रुग्ण आहेत. यामध्ये आता डॉक्टरांचाही समावेश झाल्याने भीतीचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे पालिकेच्या किटकनाशक विभागाने दोन्ही रुग्णालयांचा परिसर पिंजून काढला. तसेच धूराची फवारणीही केली होती. मात्र तरीही डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची काय अवस्था असेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.