मुंबई :  शॉपिंग करायचीय आणि क्रेडिट किंवा डेबीट कार्ड घरी विसरला असाल तरी चिंता करण्याचं कारण नाही,  तुमच्याजवळ रेल्वेचा पास असेल तर मग तुम्ही त्यावरही मनसोक्त शॉपिंग करू शकता. चक्रावून जाऊ नका.. ही रेल्वेची नवी भन्नाट योजना आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेचा पास काढा आणि शॉपिंग करा. रेल्वेच्या पासचं रुपांतर क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या स्वरुपात होणारय. १,३ आणि ६ महिन्यांचा आणि १ वर्षाचा पास काढणा-या लोकल प्रवाशांना आता रेल कार्डच्या स्वरुपात पास मिळणारय. 


या रेलकार्डचा वापर शॉपिंगसाठीही करता येणारय. याबाबत रेल्वेची स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, एचडीएफसी अशा ३१ बँकांशी बोलणीही सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. देशातल्या १.१० कोटी प्रवाशांसाठी हे रेल कार्ड अस्तित्वात येणारय.