मुंबई : निवडणुकांच्या रणधुमाळीत आजवर तुम्ही विविध प्रकारचे उमेदवार पाहिलेयत. पण आज आपण असा उमेदवार पहाणार आहोत ज्याची उंची लहान असली तरी कामाची तळमळ मात्र मोठी आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा उमेदवार प्रचाराला आला की सा-यांच्याच त्याच्यावर नजरा खिळतात. मुंबईतल्या विक्रोळीमधून मनसेनं जयंत दांडेकर यांनी उमेदवारी दिलीय. दांडेकर अगदी लहान आहेत. पण वयाने नाही तर उंचीनं.  


विविध सामाजिक उपक्रमांमध्ये दांडेकर यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळंचं मनसेनं त्यांना उमेदवारी देऊ केलीय. उमेदवार कसाही असो त्याने परिसरातल्या समस्या सोडवाव्या असं मत मतदार व्यक्त करतायत.