मुंबई : लोकल ट्रेनमध्ये माकडाचा धाक दाखवून प्रवाशांकडून पैसे उकळणा-या तीन महिलांना अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएसटीहून ठाण्याकडे जाणा-या लोकलच्या अपंग डब्ब्यात तीन महिला माकडांसह प्रवास करत असल्याची माहिती आरपीएफला मिळाली होती. त्यावरुन घाटकोपर स्टेशनवर सापळा रचून ही कारवाई केली.


या कारवाईत पोलिसांनी तीन माकडे ताब्यात घेण्यात आली. ही माकडे वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली आहेत.