श्रेया उकीलचा सोशल मीडियावर बोलबाला, बड्या आयटी कंपनीला शिकवला धडा
गेल्या दोन दिवसांपासून श्रेया उकील या तरुणीचं नाव सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय.
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून श्रेया उकील या तरुणीचं नाव सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय. श्रेयानं एक मोठी लढाई जिंकलीय. लंडनमधल्या एका लेबर ट्रियब्युनलने श्रेयानं विप्रो या बड्या कंपनीनं आयटी कंपनीच्या व्यवस्थापनवर लावलेले लिंगभेदाचे आरोप मान्य केलेत.
विप्रोने १० कोटी द्यावेत!
श्रेयानं आपल्या तक्रारीत विप्रोनं १० कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केलीय. श्रेया उकीलनं २०१५मध्ये विप्रोच्या व्यवस्थापकांवर लिंगभेदाचे आरोप लावले. विप्रोमधले वरिष्ठ कर्मचारी माझा छळ करतात. शिवाय स्त्री असल्यानं पुरुष कर्मचा-यांइतका पगारही देण्यात येत नाही, असाही श्रेयाचा दावा आहे.
श्रेयाच्या आरोपात सत्य
याप्रकरणी श्रेयाचे आरोप प्रथम दर्शनी सत्य असल्याचं कोर्टानं मान्य केलंय. पण नुकसानभरपाई विषयी पुढच्या महिन्यात निर्णय घेण्यात येणार आहे. असं असलं, तरी व्रिपोने मात्र निकाल आमच्याच बाजूनं लागणार असल्याचं म्हटलंय.