कपील शर्मावर गायक अभिजीत भडकला
मी मागच्या 5 वर्षांमध्ये 15 कोटी रुपयांचा कर दिला आहे, तरीही मला मुंबई महापालिकेत 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते.
मुंबई : मी मागच्या 5 वर्षांमध्ये 15 कोटी रुपयांचा कर दिला आहे, तरीही मला मुंबई महापालिकेत 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते. कुठे आहेत अच्छे दिन असा सवाल कपीलनं ट्विटरवरून विचारला होता. कपीलच्या या ट्विटमुळे वाद निर्माण झाला.
कपीलच्या या ट्विटमुळे त्याच्यावर टीकाही होत आहे. मुंबई महापालिकेच्या प्रश्नाबाबत पंतप्रधानांना ट्विट करण्याची गरज काय असा सवाल काही जण विचारत आहेत. गायक अभिजीतनंही कपील शर्मावर निशाणा साधला आहे.
पतलून मे आग लगी तो फायर ब्रिगेड नही डॉक्टर को बुलाते है, 60 साल के बुरे दिन भुल गये असं ट्विट अभिजीतनं केलं आहे.
तसंच तू आज जो काही आहेस तो मुंबईमुळे आहेस, तुझी संपत्ती तू कोणाला दाखवतोयस. पटियाला पालिका आणि मुंबई महापालिकेमध्ये फरक आहे, असंही अभिजीत म्हणाला आहे.