मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केविलवाना आक्रोश सुरु आहे. शेवटी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली, असे शिवसेनेचे भाजपाच्या पोस्टरला प्रति उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या शिवसेना-भाजपमधील पोस्टर वाद चर्चेचा विषय झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटाबंदीच्या निर्णयावरुन पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणाऱ्या मित्रपक्ष शिवसेनेला, भाजपनं होर्डिगच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपने थेट शिवसेना भवनाच्यासमोर होर्डिंग लावून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पंतप्रधान मोदींना आशीर्वाद देत असल्याचा फोटो या होर्डिगवर लावण्यात आला होता. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून दादर पोलिसांनी हे होर्डिंग काढून टाकले. 


भाजपने शिवसेनेला पुन्हा डिवचताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळ्यापैशा विरोधतील लढाईला बाळासाहेबांचे आशीर्वाद या पोस्टरच्या माध्यमातून दिसून येत आहे. काळ्या पैशाचा खात्मा, हेच अच्छे दिन, असे बॅनर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी हे लावले आहे. त्यामुळे पुन्हा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेनेत वाद अधिक गडत होण्याची शक्यता आहे.


संपूर्ण मुंबईत होर्डिगच्या माध्यमातून भाजपकडून मार्केटिंग करण्यात येत आहे. पण संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी ही होर्डिंग्ज काढली. असे असले तरी आता शिवसेनाही मैदानात उतरली आहे. भाजपला जशासतसे उत्तर देण्यासाठी नरीमन पॉइंट येथे भाजपच्या पोस्टरच्याच बाजुला शिवसेनेचे पोस्टर लावण्यात आले आहे. आता शिवसेना प्रमुखांची मोदींना आली, असे उल्लेख त्यावर आहे.