नागरिकांच्या सोयीसाठी बँकांची विशेष व्यवस्था
नागरिकांना नोटा बदलता याव्यात यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी बँकांचे व्यवहार सुरु आहेत.
मुंबई : नागरिकांना नोटा बदलता याव्यात यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी बँकांचे व्यवहार सुरु आहेत.
नोटा बदलण्यासाठी आणि बँकेत पैसे जमा करण्यासाठी बँकांमध्ये गर्दी झालीय. याच पार्श्वभूमीवर ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबईतल्या काही बँकांनी विशेष व्यवस्था केलीय.
विक्रोळीमध्ये एका बँकेनं ग्राहकांसाठी खुर्च्या, चहा आणि पाण्याची व्यवस्था केलीय. बँकेनं केलेल्या या व्यवस्थेमुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केलंय.