पगार वाढीसाठी एसटी कामगारांचा ३ जानेवारीला मंत्रालयावर मोर्चा
पगार वाढीसाठी एस टी कामगारांचा ३जानेवारी रोजी मंत्रालयावर `हल्ला बोल मोर्चा` नेण्याचा निर्धार केला आहे. वेतन कराराची मुदत ३१ मार्च २०१६ रोजी संपली असून १ एप्रिल २०१६ पासून नवीन वेतन करार आमलात न आल्याने हे आंदोलन एस टी कामगारांकडून करण्यात येणार आहे.
मुंबई : पगार वाढीसाठी एस टी कामगारांचा ३जानेवारी रोजी मंत्रालयावर 'हल्ला बोल मोर्चा' नेण्याचा निर्धार केला आहे. वेतन कराराची मुदत ३१ मार्च २०१६ रोजी संपली असून १ एप्रिल २०१६ पासून नवीन वेतन करार आमलात न आल्याने हे आंदोलन एस टी कामगारांकडून करण्यात येणार आहे.
एस टी कामगार मंत्रालयावर हल्ला बोल मोर्चा काढतील, असा इशारा महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते आमदार भाई जगताप यांनी यांनी दिला आहे. संघटनेच्या राज्य कार्यकारीणीच्या टिळक भवन दादर( मुंबई )येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
शासनाने एस टी कामगारांच्या पगार वाढीसाठी मे २०१६ मध्ये वेतन सुधार समिती नेमली असून शासनाने ठरवून दिल्या प्रमाणे या समितीने आपला अहवाल तीन महिन्यात देणे आवश्यक असताना अद्यापी एस टी प्रशासनाकडे या समितीने अहवाल दिलेला नसून निव्वळ वेळकाढूपणा चाललेला आहे. अहवाल देण्यात काही अडचणी असतील तर अंतरीम वाढ तरी कामगारांना द्यायला हवी. पण एस् टी प्रशासन ढीम्म असून कमी पगारामुळे कामगारांना कुटुंब चालविने कठीण होऊन बसले आहे. अनेकांना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत असल्याचे ते म्हणालेत.
शासन कर्जबाजारी असतांना त्यांच्या कामगारांना ७ वा वेतन आयोग मिळणार असेल तर एस् टी कामगारांना का नाही ? आज जी महामंडळाची चांगली स्थिती आहे. ती निव्वळ कर्मचा-यांमुळे आहे . कामगारांनी कमी पगारात काम केल्यामुळेच हे शक्य झाले असून राहणीमानाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या कामगारांप्रमाणे वेतन निश्चिती करून एस् टी कामगारांना सुद्धा ७ व्या वेतन आयोगाच्या धर्तीवर पगार वाढ झाली पाहिजे अशी मागणीही जगताप यांनी यावेळी केली.