नोटांच्या लुटीचं स्टिंग ऑपरेशन, झी मीडियाच्या पत्रकाराला मारहाण
500 आणि 1000 च्या नोटांच्या बदल्यात 400 आणि 800 रुपये देऊन त्यांची लूट करणा-या लुटारूंचे स्टिंग ऑपरेशन करताना झी मीडियाचे पत्रकार आणि इतर दोन पत्रकारांना मारहाण करण्यात आली आहे.
मुंबई : 500 आणि 1000 च्या नोटांच्या बदल्यात 400 आणि 800 रुपये देऊन त्यांची लूट करणा-या लुटारूंचे स्टिंग ऑपरेशन करताना झी मीडियाचे पत्रकार आणि इतर दोन पत्रकारांना मारहाण करण्यात आली आहे. तसंच जीवे मारण्याची धमकही या पत्रकारांना देण्यात आली आहे.
मुंबईतल्या विक्रोळी परिसरामध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी मारहाण करणारा युवक आणि आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोघांवरही पुढची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान भाजप खासदार किरीट सोमय्यांनी या ठिकाणी जाऊन भेट दिली आहे.