सनबर्न पार्टीला मुंबई पोलिसांनी दिली परवानगी
पुण्यात शेवटच्या क्षणाला यशस्वी झालेली सनबर्न पार्टी आता मुंबईही होणार आहे. नाही नाही म्हणत मुंबई पोलिसांनी पार्टीला परवानगी दिली आहे.
मुंबई : पुण्यात शेवटच्या क्षणाला यशस्वी झालेली सनबर्न पार्टी आता मुंबईही होणार आहे. नाही नाही म्हणत मुंबई पोलिसांनी पार्टीला परवानगी दिली आहे.
शेवटच्या क्षणाला परवानगी मागायची आणि आपल्या पदरात परवानगी पाडून घ्यायची हा सनबर्नचा डाव मुंबईत यशस्वी झाल्याचा दिसून येत आहे. पोलिसांनी आधी नकार दिला होता. मात्र, आज दुसऱ्या दिवशी परवानगी दिली.
मुंबईत सनबर्न फेस्टिव्हल सुरु होणार आहे. सगळी तयारी झाली होती पण दोन दिवसांपूर्वीच बीएमसीने परवानगी नाकारल्याने सनबर्नने बीकेसी येथे पार्टीचे आयोजन करण्याचे ठरवले होते. याकरिता त्यांना मुंबई पोलीसांची परवानगी आवश्यक होती. त्याकरता सरबर्नचे आयोजक मुंबई पोलीसांकडे आले होते. मात्र, पोलिसांनी आधी नकार दिला. आता रितसर परवानगी देऊन टाकली. त्यामुळे पार्टीचा मार्ग मोकळा झालाय.
मात्र मुंबई ही सतत दहशतवादाच्या टार्गेटवर असते अशात शेवटच्या क्षणाला परवानगी देणे कठीण असल्याचे सांगत मुंबई पोलिसांनी सरबर्न पार्टी आयोजकांना परवानगी नाकारली होती. पण दुसऱ्या दिवशी कशी काय परवानगी दिली, याची चर्चा सुरु आहे.