मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं दहीहंडी उत्सवाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा निकाल 17 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलाय.. दहीहंडीची उंची 20 फूटांपेक्षा जास्त असणे आणि अठरा वर्षांच्या खालच्या गोविंदांना हंडीच्या पथकात सामील होण्याच्या निर्णयाविषयी राज्य सरकारनं स्पष्टीकरण देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवर कालच निर्णय य़ेणं अपेक्षित होता. 


मात्र याचिकाकर्त्यांचे वकील न्यायलयात हजर नसल्यानं याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली. उच्च न्यायालयातली याचिका निकाली निघाल्यावरच याबाबत निर्णय देणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. या याचिकेवर उच्च न्यायालयात 12 ऑगस्टला सुनावणी आहे.  दरम्यान लवकरच याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्या वर्षी दहीहंडी दरम्यान नियमांचं उल्लंघन झाल्यानं उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय.