मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांना एका चॅनेलवर मुलाखतीदरम्यान त्यांची कन्या प्रणिती हिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी प्रणितीला तिच्या लग्नाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे ते म्हणाले. तसेच जातीबद्दलही कोणता आक्षेप नसल्याचे शिंदेनी सांगितले. 


लग्नासाठी मुलीवर दबाव टाकणार नाही. आपला जोडीदार कोण असावा हे निवडण्याचा अधिकार तिला आहे. तिने कोणत्याही जातीतील जोडीदार निवडावा. मात्र ती व्यक्ती कमावणारी असावी. सक्षम असावी. त्याने तिला नेहमी साथ द्यायला हवी, मी आंतरजातीय लग्न केल्याने माझा त्याला कधीही आक्षेप नाही. असे पुढे शिंदे म्हणाले.