मुंबई : आपल्या वादग्रस्त व्याख्यानांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे डॉ. झाकीर नाईक, आज मुंबईत परत येण्याची शक्यता आता मावळल्यात जमा आहे. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशननं उद्या जाहीर केलेली पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली आहे. 


झाकीर नाईक मुंबईतल्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे प्रमुख आहेत. दोन आठवड्यांपूर्वी बांग्लादेशात झालेल्या अपहरण आणि हत्या नाट्यातल्या दहशतवाद्यांनी जाकीर नाईकच्या उपदेशातून प्रेरणा घेऊन हल्ला केल्याचा दावा केला होता. तेव्हापासून झाकीर नाईक यांच्या फाऊंडेशनची कसून चौकशी सुरू झालीय. या पार्श्वभूमीवर आज झाकीर नाईक मुंबईत परत येण्याची शक्यता होती. चौकशी सुरू झाल्यावर जाकीर नाईक यांनी दुबईतून आरोप फेटाळण्यासाठी एक व्हिडीओ मेसेज पाठवला होता. तिथून ते आज परत येणार असल्याची माहिती मिळाली. पण आता ही शक्यता धुसर होत चालली आहे.