मुंबई : कँन्सर रूग्णांसाठी मोठी मदत रक्कम देण्याची इच्छा देणारे फोन काही जणांनी रूग्णालयात केले होते. परंतु टाटा रूग्णालय पँन नंबरच्या सहाय्यानेच मदत स्वीकारत असल्यानं, अशा काळ्या पैशाच्या मदतीला आळा बसलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५०० आणि १००० रूपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर अनेक मंदिरांमधील दानपेट़्या जुन्या नोटांनी भरून वाहतायत, तर दुसरीकडं रूग्णालयांमधील दानपेट्याही जुन्या पाचशे, हजारच्या नोटांनी भरून वाहत आहेत. मात्र प्रत्यक्षात मदत आली तर पॅनकार्डनेच स्वीकारण्याची भूमिका टाटा हॉस्पिटलची आहे.


टाटा कँन्सर रूग्णलायतील दानपेट्या तर केंद्र सरकारचा निर्णय आल्यानंतर तीन चार दिवसातच तुडूंब भरले. तसंच इतर वेळी आठवड्यात ४० ते ५० हजार रूपये वीस दानपेट्यांमधून जमा होत असतं, परंतु यावेळी तीन चार दिवसांत दुप्पट म्हणजे एक लाख रूपयांच्या आसपास रक्कम जमा झाली. यामध्ये सर्वात जास्त ५०० आणि १००० रूपयांच्या जुन्या नोटांचा भरणा झालाय.