मुंबई : मुंबईत आज टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी संपाचं हत्यार उपसलंय. ओला आणि उबर टॅक्सी वाहतूक कंपनी विरोधात हे संपाचं पाऊल उचललंय. त्यातच रेल्वे विस्कळीत झाल्याने मुंबई करांचे हाल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हजारो टॅक्सीचालक आज आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा चालक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या संपामुळं मुंबईकरांना फटका बसणार आहे. 


मुंबई शहर आणि परिसर तसेच ठाणे, नवी मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस पडला. रात्री बरसणाऱ्या पावसानंतर आता मुंबापुरीतला पाऊस थांबलाय. पण रात्रभरात झालेल्या मुसळधार पावसानं आजच्या दिवसाची सुरूवात मात्र लेटमार्कनं झालीय. मुंबईतल्या तिन्ही रेल्वे मार्गावरची वाहतूक किमान २० उशिरानं सुरू आहे.