महापालिका निवडणुकीत या जोडप्यांना उमेदवारी
मुंबईत वर्षानुवर्षांच्या निष्ठेचं फळ मिळेल या आशेनं तिकिटांची प्रतीक्षा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा एकीकडे अपेक्षाभंग झाला तर दुसरीकडे काही जोडप्यांना तिकिटाची लॉटरी लागली.
मुंबई : मुंबईत वर्षानुवर्षांच्या निष्ठेचं फळ मिळेल या आशेनं तिकिटांची प्रतीक्षा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा एकीकडे अपेक्षाभंग झाला तर दुसरीकडे काही जोडप्यांना तिकिटाची लॉटरी लागली.
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या केसरबेन मुरजी पटेल आणि त्यांचे पती मुरजी पटेल यांना भाजपनं उमेदवारी दिली. अंधेरी पूर्व क्षेत्रातून प्रभाग क्र. 81 आणि 76 मधून पती पत्नीला उमेदवारी देण्यात आलीय.
केसरबेन पटेल या काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. मोठी रॅली काढून मुरजी पटेल यांनी शक्ती प्रदर्शन केले. तर शिवसेनेत पत्नीला तिकीट नाकारल्यानं भाजप प्रवेश केलेल्या दिनेश पांचाळ यांना आणि त्यांच्या पत्नीलाही भाजपनं उमेदवारी दिलीय.
याशिवाय कुलाब्याचे अपक्ष नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनीही अलिकडे भाजप प्रवेश केला होता. मकरंद यांना तसेच त्यांच्या वहिनी हर्षिदा नार्वेकर यांनाही भाजपने उमेदवारी दिलीय.