मुंबई : 10 महापालिका, जिल्हापरिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी सध्या सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यासाठी आता अगदी काही तास उरलेत. आज संध्याकाळी साडे पाच वाजता महापालिकांचा तर मध्यरात्री जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांचा प्रचार संपणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे प्रचाराचा शेवटचा शनिवार कॅश करण्यासाठी सगळच्या बड्या नेत्यांनी कंबर कसलीय. मुख्यमंत्री आज जवळपास सगळ्याच महत्वाच्या शहारांमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. मुंबईत आजची संध्याकाळ मुंबईकरांसाठी तर राजकीय आरोपप्रत्यारोपांची अंतिम फेरी रंगणार आहे. 


मुख्यमंत्री सोमय्या ग्रांऊंडवर, उद्धव ठाकरे बेकेसी मैदानावर, राज ठाकरे दादरमध्ये तर अशोक चव्हाण वडाळा अँटॉप हिल परिसरात जाहीर सभा घेणार आहेत.