मुंबई : सध्याच्या घडीला महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्या तरी अनेकदा त्यांना घर आणि ऑफिस सांभाळताना तारेवरच कसरत करावी लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मूल झाल्यानंतर स्त्रीच्या जीवनात मोठा बदल होतो. त्यातच ती वर्किंग वुमन असेल तर सर्वच आघाड्यांवर तिला लढाई लढावी लागते. एकीकडे ऑफिसमध्ये ती काम करत असली तरी तिचे चित्त पाळणाघरात ठेवलेल्या बाळाकडेच असते.


अशाच एका पुणेकर वर्किंग वुमनचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. स्वाती चितळकर असे या महिलेचे नाव आहे. त्या सिंडिकेट बँकेत काम करतात. या फोटोत स्वाती चितळकर एकीकडे त्यांचे काम करतायत तर दुसरीकडे त्यांचा चिमुकला जमिनीवर लेटलेला दिसतोय.


ही पोस्ट टाकताना त्यांनी म्हटलेय, जमिनीवर पहुडलेला केवळ माझा मुलगा नाहीये तर ते माझं हृद्य आहे. कामाचा अर्धा दिवस तर झालाय. मला एक अर्जंट लोन रिलीज करायचेय. माझा मुलगा पाळणाघरात राहायला तयार नव्हता. लोन रिलीज करायचे असल्यामुळे मी सुट्टी घेऊ शकत नाही. मात्र मी माझ्या दोन्ही ड्युटीज निभावू शकते. केवळ विधानसभेत झोपा काढणाऱ्या मंत्र्य़ांसाठी माझा हा मेसेज आहे.


चितळकर यांचा हा फोटो बरंच काही सांगून जातो. घर आणि ऑफिस दोन्हीकडे काम सांभाळताना महिलेला कोणत्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागते हे या फोटोवरुन समजते.