मुंबई : ऑनलाइन व्यवहारासाठी वापरात असलेल्या डिजिटल पेमेंट कंपनी अर्थात पेटीएमच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. ही वाढ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबरला ५०० आणि १०००च्या नोटा रद्द झाल्याची घोषणा केल्यानंतर झाली. 
 
नोटा रद्द झाल्याच्या घोषणेनंतर पेटीएमच्या वापरामध्ये तब्बल २५० टक्क्याने वाढ झाली. तर पेटीएमचं अॅप डाऊनलोड करण्याऱ्यांच्या संख्येतही २५० टक्क्यांनी वाढ झाली. या निर्णयामुळे पेटीएमला ऑनलाईन व्हिजिट करणाऱ्यांची संख्या देखील ४३५ टक्क्यांनी वाढली आहे. 


'काळा पैसा आणि नकली नोटा बाहेर काढण्यासाठी उचलण्यात आलेलं हे सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारनं घेतलेल्या या निर्णयाला आमचा देखील पाठिंबा आहे. व्यवहारासाठी पेटीएमचा जास्तीत जास्त वापर सध्या केला जात आहे', असं पेटीएमचे सीएफओ मधुरा देवडा यांनी म्हटलंय.