मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवरती टोल आकारणीला उद्या 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे. ज्यांच्याकडे पैसे नसतील त्यांच्यासाठी स्वाईप मशिनची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता, सध्या राष्ट्रीय महामार्गांवरच्या टोलनाक्यांवरती टोल आकारणी थांबवलेली आहे. दरम्यान, टोलनाक्यांवरती १५ डिसेंबरपर्यंत जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार होत्या. दरम्यान, टोलनाक्यावर प्रवाशांचा खोळंबा होऊ नये याकरता, पुरेशा स्वाईप मशिनची व्यवस्था करण्यात आली आहे.


दरम्यान, आता पेट्रोल पंपावर पाचशेच्या जुन्या नोटा उद्यापर्यंतच स्वीकारल्या जाणार आहेत.  यापूर्वी पाचशे नोटा स्वीकारण्याची मुदत 15 तारखेपर्यंत देण्यात आली होती. पण हे निर्देश आता रद्द करण्यात आले आहेत. पेट्रोल पंप कमिशनचे अड्डे बनल्याचं लक्षात आल्यावर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.