मुंबई : शहरात प्रवेश करण्यासाठी पाच प्रवेशद्वार आहेत. एंट्री पॉईंटवरचे टोल बंद करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आश्वासन दिलं खरं पण अजुनही नागरिकांना टोल द्यावाच लागतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरून आल्यास टोल भरावा लागतो. फक्त खासगी वहानांना यात सूट आहे. व्यावसायिक वाहनांना 130 रुपये टोल द्यावा लागतो. जीव्हीके तर्फे फलक लावून टोल वसुली केली जातेय. याचा फटका सामान्यांना बसतोय. 


ही अवैध टोलवसूली बंद करण्य़ाची मागणी मनसेनं केलीय. जीव्हीके कंपनीविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणीही करण्यात आलीय. टोलला नकार दिल्यास इथल्या कर्मचा-यांकडून गुंडगिरी केली जात आहे.
  
मनसेनं याविरोधत जनहीत याचिका दाखल केलीय. तर शिवसेनेनंही वसुली बंद करण्याचा इशारा दिलाय. दरम्य़ान 2016 साली टोल वसुली दरवाढ करून नव्यानं सुरू करण्यात आली.