मुंबई : काही महिन्यापूर्वी २०० रु. प्रतिकिलो पर्यंत तूर डाळीचे भाव गेल्यामुळे अनेकांच्या ताटातून तूरडाळ गायब झाली होती. मात्र तूरडाळीचे भाव कमालीचे गडगडले असून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्यावर्षी तुरीला चांगला भाव आल्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली. त्यात पाऊस काळ चांगला झाल्यामुळे तुरीचे पीक जोमात आले. परिणामी सध्या बाजारात तुरीची आवक वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हमी भावा पेक्षा कमी भाव तुरीला मिळत आहे.त्यामुळे तुरीचे किरकोळ बाजारातील दरही आता गडगडणार आहेत. 


तुरीच्या बाजारासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या लातूर मार्केट मध्ये सध्या दररोज ०१ हजार क्विंटल तुरीची आवक होत आहे. शेतकऱ्यांना कमीत-कमी ५२०० रुपये ते जास्तीत जास्त ५७०० रुपये प्रति क्विंटल भाव तुरीला मिळत आहे. एकूणच तुरीचे उत्पादन जास्त झाल्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.