राज्यातील ४ पर्यटन विकास आराखड्यांना मंजुरी
पर्यटन विकास आराखडा या राज्यातील चार पर्यटन विकास आराखड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
मुंबई : रायगड किल्ला जतन, संवर्धन व पर्यटन विकास आराखडा, म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, सुलीभंजन पर्यटन विकास आराखडा, लोणार पर्यटन विकास आराखडा, माहूर देवस्थान पर्यटन विकास आराखडा या राज्यातील चार पर्यटन विकास आराखड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
यावेळी विकास आराखड्यात पर्यटकांसाठी मुलभूत सोयी-सुविधांना प्राधान्य देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले. रायगड किल्ल्यावरील कामांना प्राधान्य देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही किल्ले संवर्धनावर जोर दिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले संवर्धनाची मागणी मनसेकडून अनेक वेळा जाहीर सभांमधूनही करण्यात येत होती.