मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सध्या संप पुकारलाय. मात्र, हा संप शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या पथ्यावर पडतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सकाळी दादर इथे शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.


थेट माल विकल्यानं फायदा


आज सकाळी ३०० ट्रक राज्यातल्या विविध भागातून मुंबईत दाखल झाले. व्यापाऱ्यांच्या कुठल्याही मदतीशिवाय शेतकरी स्वतः हे ट्रक मुंबईत घेऊन आलेत. त्यामुळं ग्राहकांशी त्यांना थेट माल विकता आला. 


विशेष या सर्व ट्रकला राज्यभरात टोलमुक्ती करण्यात आल्याचं पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. शेतकऱ्यांनी थेट माल विकता येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. यामुळे, ग्राहकांनाही स्वस्तात माल उपलब्ध झालाय. 


उद्या पुन्हा बैठक


एपीएमसीतून भाजीपाला मुक्तीचा अधिनियम अस्तित्वात आल्यानं राज्यभरतल्या बाजार समित्यांमधले व्यापारी संपावर गेलेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी यावर उद्या पुन्हा बैठक होणार आहे.


य़ा बैठकीत तोडगा निघाला नाहीतर कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाईल असं खोत यांनी सांगितलं.