वाहतूक पोलिसाला मोटरसायकलची धडक
वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार विलास शिंदे यांच्या निधनानंतर चोवीस तासही उलटले नाहीत, तोपर्यंत कुर्ल्यातील विनोबा भावे पोलीस स्टेशन अंतर्गत बैलबाजार चोकी येथे नाका बंदी चालु असताना ही घटना घडली.
मुंबई : वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार विलास शिंदे यांच्या निधनानंतर चोवीस तासही उलटले नाहीत, तोपर्यंत कुर्ल्यातील विनोबा भावे पोलीस स्टेशन अंतर्गत बैलबाजार चोकी येथे नाका बंदी चालु असताना ही घटना घडली.
या मोटारसायकल स्वराने बैलबाजार पोलिस चोकी येथे नाकाबंदी कार्यवाही सुरू आसताना गाडी थांबविण्यासाठी इशारा केला.
मात्र भरधाव वेगाने पोलीस हवालदार देविदास अनिल निंबाळकर यांना धडक देऊन पळत काढण्याचा प्रयत्न केला, अखेर त्याला पाठलाग करून पकडण्यात आलं. हवालदार देविदास निंबाळकर यांना उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल केले आहे