तृप्ती देसाई हाजीअली दर्ग्यात दाखल
भूमाता ब्रिगेड प्रमुख तृप्ती देसाईनं गुरुवारी सकाळी मुंबईच्या हाजीअली दर्ग्यात अखेर प्रवेश मिळवला.
मुंबई : भूमाता ब्रिगेड प्रमुख तृप्ती देसाईनं गुरुवारी सकाळी मुंबईच्या हाजीअली दर्ग्यात अखेर प्रवेश मिळवला.
सुरक्षेसहीत तृप्ती हाजीअली दर्ग्यात दाखल झाली. परंतु, तिला दर्ग्यात त्याच जागेपर्यंत जाण्याची परवानगी मिळाली जिथपर्यंत सामान्य महिलांना जाऊ दिलं जातं. दर्ग्यातल्या मुख्य 'पवित्र' स्थानावर मात्र तिला प्रवेश मिळाला नाही.
काय म्हणाली तृप्ती देसाई
कुणालाही सूचना दिल्याशिवाय मी हाजीअलीमध्ये गेले आणि दर्शन घेतलं... इतर महिलांनाही दर्ग्यात जाण्यास परवनागी मिळेल, अशी मी प्रार्थना करते, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय.
दर्ग्याच्या व्यवस्थापनाचं काय म्हणणं आहे पाहा...
हाजीअली दर्ग्याच्या व्यवस्थापनानं दिलेल्या माहितीनुसार, तृप्ती एका गेटवरच डोकं टेकवून माघारी फिरल्या. जिथं महिलांना जाण्यास परवानगी नाही तिथं तृप्ती देसाई यांनाही जाऊ देण्यात आलेलं नाही.