तृप्ती देसाईंचा हाजी अलीमध्ये प्रवेश
महिलांच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी आज हाजी अली दर्ग्यात प्रवेश केला.
मुंबई : महिलांच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी आज हाजी अली दर्ग्यात प्रवेश केला.
कोणत्याही अडथळ्याशिवाय आपल्याला हाजी अली दर्ग्यात प्रवेश करता आला यासाठी तृप्ती देसाईंनी आपला आनंद व्यक्त केलाय. 'आज दर्ग्यात प्रवेश करताना कुणीही रोखलं नाही... अनेक मुस्लिम महिलांनी आमचं समर्थन केलं... यासाठी मी खूप आनंदी आहे. शनिदेवाची ज्या पद्धतीनं आम्ही पूजा-अर्चना केली त्याच पद्धतीनं हाजी अलीमध्ययेही प्रवेश केला' अशी प्रतिक्रिया देसाई यांनी व्यक्त केली.
हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश देण्याच्या मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर तृप्ती देसाईंनी आज पहिल्यांदाच हाजी अली दर्ग्याला भेट दिलीय. या दर्ग्यातील गर्भगृहात महिलांना २०११ पासून प्रवेश बंदी घालण्यात आली होती.