मुंबई: तृप्ती देसाई या महाराष्ट्राच्या कन्हैय्या कुमार आहेत, अशी टीका मुंबई पोलिसांनी केली आहे. हाजी अली दर्ग्यातल्या महिला प्रवेशाचं तृप्ती देसाईंना आंदोलन नाही तर तमाशा करायचा होता, असा आरोपही मुंबई पोलिसांनी केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाजी अली परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, म्हणून आम्ही चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. देसाईंना दर्ग्यात जाण्यासाठी आम्ही सहकार्य करायला तयार होतो, पण त्यांनी आमच्यावरच उलटे आरोप केल्याचं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 


तृप्ती देसाईंकडे आंदोलनाची आणि मुख्यमंत्र्यांना भेटण्याची परवानगी नव्हती, तरीही त्या ऐकत नव्हत्या, त्यामुळे आम्हाला त्यांना ताब्यात घ्यावं लागलं अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.