नवी दिल्ली :  सोशल मीडियावर दररोज एखादा फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होतो. पण आता एक नंबर व्हायरल होत आहे. हा नंबर डेथ कॉल असल्याचे म्हणून व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हांला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीने 777888999 नंबर व्हॉट्सअॅपवर किंवा फेसबूकवर मेसेज पाठविला असेल, त्यात या नंबर बाबत सावधान केले आहे. सोशल मीडियावर हा नंबर असा व्हायरल होत आहे की त्या नंबरला व्हायरस म्हटले आहे, हा कॉल रिसिव्ह केला तर तुमच्या फोनचा ब्लास्ट होईल असेही या मेसेजमध्ये म्हटले आहे. 


काय आहे सत्य...


याची सत्यता अशी आहे की असे काही नाही. हा नंबर कोणताही व्हायरस नाही किंवा या क्रमांकावरून फोन आल्यावर तुमच्या फोनचा ब्लास्ट होणार नाही. तसेच हा नंबर कोणाचा जीव घेत नाही. ९ आकड्यांचा हा संपूर्ण क्रमांक मेसेजसह व्हायरल होत आहे, त्यामुळे लोक घाबरले आहेत. 



सत्यता पडताळणी नाही...


लोकांनी या क्रमांकाची सत्यता न पडताळता या बाबत भ्रम निर्माण केला आहे. हा नंबर कोणाचा आहे, कुठला आहे, हा नंबर खरा आहे वा खोटा... फक्त लोक व्हायरल करीत आहेत. याची सत्यता न पडताळथा आपल्या आलेला मेसेज पुढे सरकवणे फक्त येवढे काम लोक करीत आहेत. 


९ क्रमांक कोणाचे असतात...


१० डिजिट पेक्षा कमी क्रमांक काही देशांचे आहेत. पण त्या अगोदर देशाचा कंट्री कोड असतो. भारताचा कंट्री कोड +९१ आहे... 


घाबरू नका...


या मेसेजमुळे घाबरू नका. या नंबर संदर्भात कोणताही घटना घडली नाही. त्यामुळे अशा फोन कॉलला घाबरण्याची गरज नाही. तसेच असा क्रमांक आणि मेसेज पुढे फॉरवर्ड करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका...


असा मेसेज कोणी पाठवला तर... 


असा मेसेज तुम्हांला आला आहे का... तर ही बातमी आता तुम्ही वाचली आहे. तर ही बातमी त्या व्यक्तीला किंवा ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा...