मुंबई : तूर उत्पादक शेतक-यांना राज्य सरकारकडून दिलासा मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. केवळ २२ एप्रिलपर्यंत नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणलेल्या तुरीचीच खरेदी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं तूर खरेदीला मुदतवाढ मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळं तूर विक्री न केलेल्या शेतक-यांची अडचण होणार असल्याचं दिलं आहे.



दुसरीकडे तूर खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी झी २४ तासशी बोलताना केला आहे. तर तूर खरेदीची मुदत वाढवली नाही तर मंत्रालयासमोर तुरीनं भरलेली ट्रक्टर्स नेणार असल्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलाय. त्यामुळं तूर खरेदीचा प्रश्न चिघळणार असल्याचं दिसतं आहे.