शिवसेनेचा भागवत यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा
इतर राज्यात राज्यपाल आणि अनेक पदांवर इतरत्र rss कार्यकर्त्यांची नेमणूक झालीय. मग देशाचं नेतृत्व त्यांनी करायला हरकत नाही, असे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे.
मुंबई : इतर राज्यात राज्यपाल आणि अनेक पदांवर इतरत्र rss कार्यकर्त्यांची नेमणूक झालीय. मग देशाचं नेतृत्व त्यांनी करायला हरकत नाही, असे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे.
हिंदुराष्ट्र संकल्पनेसाठी भागवत हेच लायक असतील का ? असा पत्रकारांनी विचारले असता उद्धव म्हणाले, का नसावेत ? असा प्रतिप्रश्न विचारला.
मोहन भागवत यांचं नाव मनापासून राष्ट्रपती पदासाठी सुचवलं आहे.
आले मोदींच्या मनात...
शरद पवारांच्या बाबतीत म्हणायचं तर ते मोदींचे गुरू आहेत,असं मोदींनी सांगितलं. त्यांना पद्मविभूषण दिले. मला माहित नाही कुणाच्या मनात काय येईल ?
एकमेकांची मन जाणून घ्यायला तेवढी जवळीक लागते. अनेक वर्षांनी पहिल्यांदा एकहाती सत्ता आली आहे. जर कणखर आणि खंबीर राष्ट्रपती असतील तर का नको ? असे म्हणून उद्धव ठाकरे यांनी भागवतांच्या नावाला पुन्हा एकदा पाठिंबा दिला आहे.