मुंबई : तुमचं व्हिजन तुमच्याकडे ठेवा. मुंबईकडे वाकड्या डोळ्यांने पाहाल तर सहन करणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती होण्याबाबत सूचक विधान केले होते. भाजपचे व्हिजन शिवसेनेला मान्य असेल तर युतीचा विचार होईल, अन्यथा नाही, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदिले होते. याला उद्धव ठाकरे यांनी मुंबईत जाहीर उत्तर दिले.


भाजपचे व्हिजन शिवसेनेला मान्य असण्याचा मुद्दा नाही. तुमचे जे काही व्हिजन आहे ते तुमच्याकडेच ठेवा. मुंबईकडे वाकड्या डोळ्याने पाहाल तर ते खपवून घेतले जाणार नाही. विकास करण्यात आम्ही बांधील आहोत. त्यांचे व्हिजन तपासण्यासाठी मी नाही. त्यांनी त्यांचा विचार करावा. माझा शिवसैनिक खंबीर आहे, असे सांगत युती झाली नाही तरी काहीही बिगडत नाही, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.