मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख् उद्धव ठाकरे यांच्यात जोरदार कलगीतुरा सुरू आहे.  मुख्यमंत्र्यांनी मुलुंड येथील सभेत अर्धवट अहवाल आणला असे म्हणताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना अर्धवटराव म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांदिवली येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.  उद्धव ठाकरे म्हटले की मला कोणी तरी म्हटले राम मंदिर बांधलंय. मी म्हटलं कुठे आहे. तर ते म्हणाले पारदर्शक आहे.... तर असं न दिसणारं राममंदिर भाजपने बांधले आहे. 


अर्धवटराव...


मुख्यमंत्र्यांनी आज मुलुंडच्या सभेत अहवालाची अर्धवट कॉपी आणली.  जे काही सांगितले ते अर्धवट सांगतले. मी आजही ठामपणे सांगतो की मुंबई महापालिका पारदर्शकतेत क्रमांक एकची महापालिका आहे. माझ्याकडे संपूर्ण अहवाल आहे अर्धवटराव... म्हणजे मुख्यमंत्री साहेब.....
तुम्हांला जर हा संपूर्ण अहवाल पटत नसेल तर केंद्रात काय बसले ते काय गाढवं बसलीत आहे. तेच तुमचे नेते आहेत. त्यांना हा प्रश्न विचारा असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.


मुंबई आणि पाटणाचा अपमान....


मुंबईची तुलना पाटणाशी करून मुख्यमंत्र्यांनी मुंबईची आणि पाटणाचा अपमान केला आहे. पाटणा आणि मुंबईच्या तुलनेत जराही बरोबर असेल तर मी राजकारण सोडेन.. तुम्हांला सांगता आले नाही तर तुम्ही राजकारण सोडा... 


पाहा काय म्हटले उद्धव ठाकरे... 


- भाजपने राम मंदीर बांधले आहे, परंतु ते पारदर्शक असल्याने दिसत नाही 
- सीएम यांचा घसा आता उठला वाटतं. पूर्वी आस्था होती त्यांच्याविषयी पण आता नाही
- मोदींना मग्रूर हाच शब्द शोभतो
- सीएम दीनवाणी आहेत
- केंद्राने पारदर्शक बांबू दिलाय
- अहवाल खोटा नाहीय...मी सोबत आणला आहे. यात अर्धवट काय आहे अर्धवटराव
- अहवालातील शेवटची शहरं भाजपची आहेत
- सीएम केंद्रात बसलेली तुमची गाढवं बसली आहेत का
- ११४ जागा मागायच्या, हे काय हलवाईचे दुकान आहे का ? 
- पातळी सोडून टीका केली जात आहे
- सीएमना जाहीर आव्हान, पाटणा व मुंबईच्या तुलनेत जराही बरोबर असेल तर मी राजकारण सोडेन
- पाटणाचा अपमान त्यांनी केलाय
- एवढी खोटी माणसं आपण २५ वर्षे जपली याचे वाईट वाटतंय
- त्यांनी छापलेला स्टँम्प पेपर हा तेलगींचा
- मोदींचा फोटो जाहिरनाम्यावर का नाही, त्यांच्यावर विश्वास राहिला नाही का
- तुमच्या खोटेपणाला देश कंटाळला आहे. जसं पीएम बोलत आहेत तसं हेही
- नागपूरचा पारदर्शक कारभार का दिसत नाही
- तुम्ही नागपूरचे महापौर असताना कसली चौकशी झाली होती, त्याचे उत्तर द्या
- खोटे बोलून मी मते घेत नाही
- मी गांगरणारा नाही, सीएम..तुम्हाला आता सेना प्रतिस्पर्धी आहे. आम्ही केलेली कामे एकतरी खोडून दाखवा.
- सफाई कामगारांना त्यांच्या हक्काची घरे देणार 
- विधानसभा निवडणुकीत बाळासाहेबांच्या स्मारकाचे वचन मी दिले आहे
- भाजप हा नवीन तुरुंग , सर्व भ्रष्टाचारी आता भाजपमध्येच
 - परिवर्तन भाजपमध्ये होतंय. बीएमसीप्रमाणे कँबिनेटमध्ये विरोधी पक्षनेते व पत्रकार हवेत
- हीच पद्धत मग केंद्रातही आणा
- मोदींची मनमानी सहन करणारी नाही
- ऑनलाईन कारभार करा, म्हणजे कुणी चिक्की खाल्ली ते समजेल
आता यांच्या स्टेजवर पप्पू कलानी, एन डी तिवारी. हे तुमचे परिवर्तन. असले परिवर्तन आम्हाला नको
- आम्ही वाईट होतो तर मग युतीच्या चर्चेला आलात का 
- तुमच्या ढोंगीपणाला कंटाळून युती तोडली
- आमच्या टेकूमुळं तुम्ही टिकलात
- मुंबई कुणालाही गिळू देणार नाही
- गिळण्याचा प्रयत्न केल्यानं घसा बसला तुमचा