मुंबई : आज बांद्रा कुर्ला कॉम्प्लॅक्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुंबईतील सहा मुख्य प्रकल्पाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचा आवाज दाबल्याची चर्चा सध्या सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचं झालं असं की, या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते. यावेळी, अन्य नेत्यांसोबत या तिघांनीही भाषणं केली... परंतु, उद्धव ठाकरे भाषण करत असताना स्पीकरमधून येणारा आवाज अचानक कमी झाला... आणि साहजिकच उद्धव ठाकरेंचा आवाज जाणून बुजून कमी करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. 


आवाज कमी असल्यानं उपस्थित शिवसैनिकांमध्ये गोंधळ वाढला... या कार्यक्रमासाठी आलेल्या परंतु, मागच्या बाजुला उभ्या असलेल्या अनेकांपर्यंत  उद्धव ठाकरेंचा आवाजही पोहचत नव्हता... त्यामुळे, भाजपनं अशा पद्धतीनंही उद्धव ठाकरेंचा 'आवाज दाबल्याची' चर्चा जोरात सुरू झालीय. 


इतकंच नाही तर, उद्धव ठाकरे भाषण करायला उभे राहिले असता समोर बसलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी 'मोदी मोदी' घोषणा देत गोंधळ निर्माण करण्याचाही प्रयत्न केला.