प्रशांत जाधव, संपादक, 24TAAS.COM : शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता यापुढे शिवसेना एकटी लढणार असल्याची घोषणा करून भाजपशी महापालिकेत काडीमोड घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनेक चान्स सोडले, त्यांनी काही कठोर निर्णय घेतले असते तर भविष्यात त्यांना फायदा झाला असता. 


काय करू शकले असते उद्धव ठाकरे. 


१) उद्धव ठाकरे यांनी भाजपशी संपूर्ण काडीमोड घ्यायला हवा होता. 


२) राज्य आणि केंद्रातील सत्तेतून बाहेर पडायला हवे होते. 


३) भर सभेत त्यांनी आदेश द्यायला हवे होते की शिवसेना  राज्यातून आणि केंद्रातून बाहेर पडणार... असे केले असते तर त्यांना मुंबईत आणि ठाण्यात मोठे यश मिळाले असते. 


४) महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांनी केंद्रात आणि राज्यातील सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर करायला हवे होते. 


५) वरील निर्णय घेतला असता त्याचा फायदा शिवसेना नक्की झाला असता. सत्तेसाठी लाचार नाही हे यामुळे दाखविता आले असते.