मुंबई : आमदार बच्चू कडू यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नोटबंदीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांची प्रहार संघटना आंदोलन छेडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आंदोलनात शिवसेनाही सोबत असावी यासाठी ही भेट झाली. शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या प्रहारच्या या आंदोलनात शिवसेनाही सहभागी होणार असल्याची ग्वाही उद्धव यांनी बच्चू कडू यांना दिली. त्यामुळे नजीकच्या काळात होणाऱ्या विदर्भातील या आंदोलनाच्या निमित्ताने बच्चु कडूंची प्रहार संघटना आणि शिवसेना एकत्र आलेली दिसणार आहे.


 उध्दव ठाकरे यांची भेटीच्यावेळी बच्चू कडू यांनी शेतकरी प्रश्न व समस्यावर चर्चा केली. विदर्भात भाजपला शह देण्यासाठी मोठ्या आंदोलनाची व्यूहरचना करण्यात आल्याची चर्चा आहे. विदर्भ भाजपचा गड ओळखला जात आहे. शिवसेनेला येथे म्हणावे तसे यश मिळत नाही. नोटबंदीला विरोध करण्यासाठी आणि शेतकरी प्रश्नावर आक्रमक होण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारल्याचे दिसत आहे.