मुंबई :  नवी दिल्ली उद्या होणाऱ्या एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार नसल्याचे समजते आहे.  मोदींनी बोलावल्या स्नेहभोजनालाही उद्धव ठाकरे जाणार नसल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारले असता अशा प्रकारे कोणत्याही स्नेह भोजनाचे निमंत्रण मातोश्रीवर आले नाही. त्यामुळे कुठेही जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. 


जुहू स्कीम परिसरात गुलमोहर क्रॉस चौकाचं नामकरण ‘पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे चौक’ असं करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना मोदींच्या स्नेहभोजनाबद्दल विचारले असता, त्यांनी स्नेह भोजनास नाही जाणार असे स्पष्ट सांगितले जरी नसले तरी त्यांनी नकारार्थी मान हवून आपण जाणार नसल्याचे सांगितले आहे.