मुंबई : पश्चिम रेल्वेवरील लोकलमध्ये महिलांमध्ये पुन्हा एकदा हाणामारीची घटना घडलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरार-चर्चगेट लोकलमध्ये हा प्रकार घडलाय. ट्रेनच्या दरवाजावर उभे राहण्यावरुन चार महिलांमध्ये वाद झाला आणि याचं पर्यावसन हाणामारीत झालं.


प्रभा देवसघई यांनी सकाळी ७ वाजून ३१ मिनिटांनी चर्चगेटच्या दिशेने जाणारी ही ट्रेन पकडली. त्यावेळी दरवाजात उभे असलेल्या महिलांशी प्रभा यांचा वाद झाला.


या महिलांनी प्रभा यांच्या हातावर चावाही घेतला. यानंतर प्रभा यांनी या महिलांना भाईंदर रेल्वे स्थानकात उतरवलं आणि रेल्वे पोलिसांच्या हवाली केलं.


वसई रेल्वे पोलिसांनी या तिन्ही महिलांना ताब्यात घेतलंय. गेल्या काही दिवसांत लोकलमध्ये महिलांच्या डब्ब्यात हाणामारीच्या घटना वारंवार घडतायत. डहाणू-चर्चगेट लोकलमध्येही अशाच प्रकारे महिला मारहाणीची घटना घडली होती.