मुंबई : राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले ​माजी आदिवासी विकास मंत्री व विद्यमान आमदार विजयकुमार गावित यांच्या मंत्रीपदाच्या स्वप्नांना मोठा झटका बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2004 ते 2009 या काळात गावित मंत्रीपदी असतना आदिवासी विकास विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका गावितांवर ठेवण्यात आलाय. भ्रष्ट्चाराची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या गायकवाड समितीनं आपला अहवाल कोर्टात सादर केलाय. त्यातून ही माहिती पुढे आलीय.


विधानसभा निव़डणूकीच्या आधी विजयकुमार गावित राष्ट्रवादी काँगेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले. त्यावेळीही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होतेच..पण आता चौकशी समितीच्या अहवालात तत्थ सापडल्यानं गावितांच्या अडचणी वाढल्या आहेत.