मुंबई : वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या पार्थिवावर सातारा येथील शिरगाव या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान शिंदे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज वरळी बंदचं आवाहन करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व पक्षांनी या बंदला पाठींबा दिला आहे. 23 ऑगस्टला दुपारी चार आणि पाचच्या दरम्यान शिंदेंनी विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या एका अल्पवयनी मुलाला हटकले. त्याचा राग आल्यानं मुलानं आपल्या मोठ्या भावाला बोलावले.  मुलाच्या भावाने बाजूच्या दुकानातील लाकडी बांबू काढून विलास शिंदेंच्या डोक्यावर प्रहार केला.


तेव्हापासून विलास शिंदेवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. जो मुलगा गाडी चालवत होता, त्याच्याकडे लायसन्स आणि हेल्मेट दोन्हीही नसल्याचं उघड झालंय. शिवाय गाडीची कुठलही कागदपत्रही त्या मुलाजवळ नव्हती.