पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प, अनेक गाड्या रखडल्यात
जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे शनिवारी पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प पडली आहे.
मुंबई : जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे शनिवारी पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प पडली आहे.
सिग्नल यंत्रणेतील बिघात दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, एकापाठोपात अनेक गाड्या उभ्या आहेत. सध्या पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
या यांत्रिक बिघाडामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या पश्चिम रेल्वेमार्गावर रेल्वे लोकलची रांग लागलेली पाहायला मिळत आहे. या खोळंबा झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.