राज-शाहरुख भेट, एका दगडात मारले अनेक पक्षी
शाहरुखला कधी कुठला डाव टाकायचा ते चांगलंच कळतं. कृष्णकुंजवर दोन कलाकारांची भेट झाली. एक राजकारणी असूनही कलाकार आणि दुसरा कलाकार असूनही राजकारणी. शाहरुखच्या कृष्णकुंज भेटीला निमित्त होतं रईस सिनेमाच्या प्रदर्शनाचं. खरं तर पाकिस्तानी कलाकारांविरोधात मनसेनं उपसलेल्या तलवारीचं काय झालं ते ऐ दिल है मुश्कीलच्या वेळी सगळ्यांनाच कळलं. करणला ठेच लागल्यावर त्याचा मित्र शाहरुख शाहाणा झाला आणि रईसच्या वेळी उगाच रिस्क नको, म्हणत त्यानं आधीच कृष्णकुंज गाठलं. रईस सिनेमातली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान भारतात येणार नाही, एवढा निरोप देण्यासाठी शाहरुख कृष्णकुंजवर गेला होता.
दिनेश दुखंडे, मुंबई : शाहरुखला कधी कुठला डाव टाकायचा ते चांगलंच कळतं. कृष्णकुंजवर दोन कलाकारांची भेट झाली. एक राजकारणी असूनही कलाकार आणि दुसरा कलाकार असूनही राजकारणी. शाहरुखच्या कृष्णकुंज भेटीला निमित्त होतं रईस सिनेमाच्या प्रदर्शनाचं. खरं तर पाकिस्तानी कलाकारांविरोधात मनसेनं उपसलेल्या तलवारीचं काय झालं ते ऐ दिल है मुश्कीलच्या वेळी सगळ्यांनाच कळलं. करणला ठेच लागल्यावर त्याचा मित्र शाहरुख शाहाणा झाला आणि रईसच्या वेळी उगाच रिस्क नको, म्हणत त्यानं आधीच कृष्णकुंज गाठलं. रईस सिनेमातली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान भारतात येणार नाही, एवढा निरोप देण्यासाठी शाहरुख कृष्णकुंजवर गेला होता.
बॉलिवूडमधल्या खान त्रिकूटापैकी प्रत्येकासाठी राज ठाकरेंच्या मनात हळवा कोपरा आहे. मनसेच्या मराठी भाषेच्या आंदोलनात शाहरुखनं राज ठाकरेंची बाजू घेतली होती. तर वानखेडेवर शाहरुखला बंदी घालताच राज ठाकरे त्याच्या बाजूनं उभे राहिले होते. आता रईसला ऐ दिल है मुश्कील म्हणण्याची वेळ येणार नाही, याची पुरेपूर काळजी दोघांनीही घेतली. माय नेम इज खानपासून शाहरुख शिवसेनेच्या हिटलिस्टवर आहे. शाहरुखनं कृष्णकुंज गाठून शिवसेनेला डिवचलं. एवढा मोठा स्टार कृष्णकुंजवर येतो, म्हणजे आपली दहशत कायम आहे, हा संदेश राज ठाकरेंना द्यायचा होता. यानिमित्तानं 'रईस'चं प्रमोशनही झालं. बटाटावडा आणि पॅटिसवर ताव मारून झाला. गरमागरम आलं घातलेला चहाही पिऊन झाला. फोटोसेशनही झालं. तासाभराच्या या भेटीत एका दगडात अनेक पक्षी मारले गेले. इस हवा में व्यापार है साब. शाहरुखच्या रईस या सिनेमातलाच हा डायलॉग. तो जाताजाता सहज आठवला.