राज्य सरकारचा टेकू कधी काढणार याबद्दल बोलले उद्धव...
युती तुटली म्हणून मी सीएम झालो असे मुख्यमंत्री म्हणतात, पण आम्ही टेकू दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झालात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी परळ येथे झालेल्या सभेत लगावला.
मुंबई : युती तुटली म्हणून मी सीएम झालो असे मुख्यमंत्री म्हणतात, पण आम्ही टेकू दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झालात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी परळ येथे झालेल्या सभेत लगावला.
मुख्यमंत्र्यांवर घणाघाती हल्ला करत उद्धव म्हणाले, मला अनेक जण विचारतात,
टेकू कधी काढणार टेकू कधी काढणार... मी म्हणतो थोडं थांबा आम्ही लावलेल्या टेकून ते मुख्यमंत्री झाले आहे. त्यांना सत्ता उपभोगू द्या... अजून खूप वेळ आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावर १८ फेब्रवारीला शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार या वृत्ताला पूर्ण विराम दिला आहे.
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून शिवसेना १८ तारखेला होणाऱ्या अखेरच्या सभेत सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा करणार आहे. त्यामुळे अनेकांनी तर्क वितर्क लढविले होते. तसेच रावते दाखविलेल्या राजीनाम्यानंतर याला अजून हवा मिळाली होती. पण अजून सेना टेकू काढण्याचा विचारात नाही, असे उद्धव ठाकरेंच्या