मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नसल्यामुळे आता नवनव्या समिकरणांच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. शिवसेना भाजपची युती झाली नाही तर राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमध्ये शिवसेनेकडे सध्या अपक्ष नगरसेवक पकडून ८७ नगरसेवकांचं पाठबळ आहे तर भाजपकडे ८२ नगरेसवक आहेत. या निवडणुकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले आहेत.


महापौर निवडीवेळी मनसेचे नगरसेवक गैरहजर राहिले तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा शिवसेनेला होऊ शकतो. निवडणुकीआधी राज ठाकरेंनी शिवसेनेपुढे मदतीचा हात पुढे केला होता पण उद्धव ठाकरेंनी ही टाळी झिडकारली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज ठाकरे शिवसेनेला मदत करणार का हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.