`कोणालाही पाठिंबा देणार नाही, लिहून देतो`
राज्य सरकार पडल्यास मी कोणालाही पाठिंबा देणार नाही, हे मी लिहून द्यायला तयार आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलंय.
मुंबई : राज्य सरकार पडल्यास मी कोणालाही पाठिंबा देणार नाही, हे मी लिहून द्यायला तयार आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलंय.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती असल्याचा शिवसेनेनं आरोप केला, त्या आरोपाला शरद पवारांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं. दरम्यान राज्यातील पालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस सरकार पडेल, असे भाकित राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
नोटाबंदीच्या निर्णय सामान्यांना भावला, कारण त्यातून काळा पैसा बाळगणाऱ्यांचं घबाड उघड होईलं, असं सुरुवातीला सर्वांना वाटलं होतं. पण तसं काहीही घडलं नाही.
उलट सरकारने दिलेल्या आकेडवारीत मनरेगाअतंर्गत काम करणाऱ्यांची संख्या नोटाबंदीच्या काळात 80 लाखांवर गेल्याचा दावा पवारांनी केला. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये मोदी सरकारला बसेल, असंही पवारांनी म्हटले.