मुंबई : जगातल्या सर्वात वजनदार महिलांपैकी एक असलेल्या इजिप्तच्या इमाम अहमदवर मुंबईतल्या सैफी रुग्णालयात उपचार सुरु झाले आहेत. महाभयंकर वजनामुळे एमाम उच्च रक्तदाब, डिप्रेशन, दमा, फुफ्फुसांची समस्या, तसंच मधुमेहाच्या व्याधींशी झगडत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैफी रुग्णालयातले डॉक्टर मुफजल लकडावाला यांनी एमामचं वजन कमी करण्याचं आव्हान उचललं आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या विशेष पथकाचीही स्थापना करण्यात आलीय. हे पथक एमामच्या सर्व चाचण्या घेऊन नंतर शस्त्रक्रियेची तारीख निश्चित करणार आहे.


शस्त्रक्रियेनंतरही किमान सहा महिने, एमामला भारतातच रहावं लागणार आहे. दरम्यान दोन कोटी रुपये खर्चून एमामसाठी खास वन बेड हॉस्पिटल तयार करण्यात आलंय. सुमारे 3 हजार चौरस फूट लांबीच्या या रुग्णालयात ऑपरेशन थिएटर, आयसीयू, डॉक्टरांसाठी कक्ष, दोन रेस्टरुम आणि इतरही सुविधा खास बनवून घेण्यात आल्यात.